कुंग फु पांडा

|
--

बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अ‍ॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी.

'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो. पुढे जाउन पो ने आपले न्युडल्स शॉप समर्थपणे सांभाळावे हि त्याच्या वडिलांची अपेक्षा असते तर ह्याच्या अगदी उलट म्हणजे एक विख्यात कुंग फु मास्टर बनण्याचे पो चे स्वप्न असते. गंमत म्हणजे तो झोपेत देखील तो एक कुंग फु मास्टर बनल्याची स्वप्ने पाहात असतो.पिस व्हॅलीचे संरक्षक आणी मास्टर शिफुचे पाच शिष्य 'मंकी, टायग्रेस, मांटीस, व्हायपर आणी क्रेन हे पो चे आदर्श असतात. त्यांच्यासारखेच मास्टर बनायचे हा पो चा ध्यास असतो.

.

टोर्टोइज मास्टर उग्वे ह्याला कधीकाळी मास्टर शिफुचा शिष्य असलेला पण आपल्या गुंड आणी विनाशक प्रवृत्तीमुळे सध्या बंदीवासात असलेला लिओपार्ड मास्टर 'ताय लंग' हा कधितरी स्वत:ची सुटका करुन घेउन पुन्हा एकदा पिस व्हॅलीची शांतता भंग करणार ह्याची खात्री असते, त्यामुळे त्याला रोकण्यासाठी तो ड्रॅगन वॉरीअर' ह्या सर्वोच्च मास्टरची निवड करण्याचे ठरवतो. 'फ्युरियस फाईव्ह' पैकी कोणीतरी एकजण ह्या पदाचा मानकरी ठरणार हे निश्चीतच असते. अशावेळी हि स्पर्धा आणी त्यात लढणार्‍या आपल्या आदर्शांना पाहण्याच्या प्रयत्नात पो स्वत: त्या आखाड्यात येउन पडतो. गंमतीचा भाग म्हणजे अचानक आकाशातुन पडलेल्या ह्या पो ला टोर्टोइज मास्टर नवा 'ड्रॅगन वॉरिअर' म्हणून घोषीत देखिल करुन टाकतो.

.

आता मात्र पो ची चांगलीच गंमत उडते. एका बाजुला खडतर प्रशिक्षण आणी दुसर्‍या बाजुला 'फ्युरिअस फाइव्ह' समोर आपण काहिच नसल्याची सतत होणारी जाणीव पो ला हताश करुन टाकते. एके रात्री टॉर्टोइज मास्टरची चार वाक्यातली शिकवणी पो ला बरेच मानसिक बळ देउन जाते. त्याचवेळी बातमी येते ती 'ताय लंग' तुरुंगातुन पळाल्याची आणी त्या बरोबरीने टोर्टोइज मास्टरनी' आपला अवतार संपवल्याची.

.

'ताय लंग' ला रोकण्यासाठी 'फ्युरीअस फाइव्ह' त्याच्यावर एकत्र चाल करुन जातात, मात्र ह्या सर्वांना निष्प्रभ ठरवत 'ताय लंग' पिस व्हॅली मध्ये येउन पोचतो. पो त्याच्या समोर धैर्याने उभा राहु शकतो ? मास्टर शिफुची शिकवणी पो ला खराखुरा 'ड्रॅगन वॉरियर' बनवु शकलेली असते? ज्या पवित्र ड्रॅगन स्क्रॉलसाठी हा लढा चालु असतो, त्यात नक्की असते काय ? पो आपल्या सर्वात मोठ्या कमकुवतापणाचे सर्वात मोठ्या ताकादित रुपांतर करण्यात यशस्वी होतो का? ह्या सगळ्याची उत्तरे प्रत्यक्ष हा चित्रपट पाहुन मिळवण्यातच जास्ती आनंद आहे.

.

'ताय लंग'ने स्वत:ची करुन घेतलेली सुटका, 'फ्युरीअस फाइव्ह' बरोबर त्याची झालेली लढत अथवा शिफुने अगदी सोप्या पद्धतीने पो ला दिलेले ट्रेनींग हि सर्व दृष्ये खरोखरच दाद देण्याजोगी. २००८ साली निर्माण झालेला ह चित्रपट तंत्रज्ञान आणी सफाईत कुठेही कमी पडलेला नाही. ह्या चित्रपटाचे संगीत देखील चित्रपटाच्या वातावरणाला अगदी साजेसे. पो आणी त्याच्या 'फ्युरीअस फाइव्ह' मित्रांच्या ह्या पिस व्हॅलीला भेट देणे प्रत्येक चित्रपट रसिकासाठी अत्यंत आवश्यकच म्हणाना.3 टिप्पणी(ण्या):

Adi म्हणाले...

परवाच बघितला हा picture जबरदस्त आहे दुसरा कुठला शब्दच नाही माझ्याकडे.

Adi म्हणाले...

प्रसाद तू prince of Egypt बघ आणि त्यातील समुद्र जेव्हा दुभंगतो ना तो shot तर अप्रतिम, काय जबरदस्त animation केलंय आणि संगीतपण.

PrAsI म्हणाले...

@ Adi
धन्यवाद :)

बघितले आहे ते दृश्य. खूप आवडले देखील होते.
तंत्रज्ञानाने फारशी प्रगती केलेली नसताना निघालेले हे सिनेमे खरंच अमूल्य आहेत. शेजारी चित्रपटात दाखवलेला प्रलय, संत तुकाराम मधील वैकुंठगमन ही अशीच काही आवडलेली दृश्ये.

टिप्पणी पोस्ट करा